(पुणे)
“समाजसेवा हाच आमचा ध्यास” या ब्रीदवाक्यासह कार्यरत असलेला दत्तगुरु सेवा मंडळ ट्रस्ट (पाचांबे) सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) रजि महा/ 0000922/2023 एन.जी.ओ/ 2024/0479866 यांचा दुसरा वर्धापन दिन पुण्यातील श्री साई सेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा, पंढरीनाथ दांगट इंडस्ट्रियल इस्टेट, शिवणे येथे साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपासून दत्तगुरु सेवा मंडळ ट्रस्ट समाजोपयोगी कार्यात सक्रिय आहे. शिक्षण, आरोग्य, गरजूंना मदत, तसेच सांस्कृतिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये ट्रस्टने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कार्याचा पुढाकार ठेवत ट्रस्टने वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.
या वेळी ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन संचालक श्री. संदीप भरगडे यांच्याकडून माहिती घेतली आणि वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. या उपक्रमाविषयी बोलताना ट्रस्टचे पदाधिकारी म्हणाले, “आनंद देताना खरा आनंद मिळतो. समाजसेवा ही केवळ मदत नव्हे, तर आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे ट्रस्टचा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करणे हेच आमचं ध्येय आहे.”
सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
या स्तुत्य उपक्रमाद्वारे ५० किलो तांदूळ, ५० किलो गहू, डाळी, मसाले, तेल, साबण, टूथब्रश, कोलगेट यांसह अन्नधान्य व दैनंदिन वापराचे साहित्य वितरित करण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष सिताराम भुरावणे, उपाध्यक्ष संतोष कोळापटे, दीपक बोडेकर, सिद्धेश भुरावणे, सचिव दीपक घडशी, खजिनदार संतोष बोडेकर, कार्याध्यक्ष रुपेश भुरावणे, संपर्क प्रमुख महेश सावंत, दगडू बोडेकर, चिकू घडशी, सतीश बोडेकर, सुदर्शन भुरावणे तसेच मंडळातील सभासद व कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे ट्रस्टचा वर्धापन दिन समाजोपयोगी कार्याने संस्मरणीय ठरला असून, या ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित झाली आहे. समाजसेवेच्या या मार्गावर ट्रस्ट पुढील काळातही विविध उपक्रम राबवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

