(राजापूर / तुषार पाचलकर)
उत्सव, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम साधणारा पारंपरिक दहीहंडी महोत्सव यंदा राजापूर तालुक्यातील पाचल येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. पाचल पंचक्रोशी मित्र मंडळ पाचल या संघटनेने आयोजित केलेल्या या उत्सवाला आमदार किरण (भैया) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपूर्वाताई किरण सामंत यांच्या सहकार्याने शिवशक्ती महिला गोविंदा पथकाला यावेळी पाचल येथे आमंत्रित करण्यात आले होते.
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पाचल या गावात एकूण 11 दहीहंड्या फोडण्यात येतात पैकी पाचल आणि परिसरातील सर्वात मोठं आकर्षण ठरलेली आणि पंचवीस हजार पाचशे पंचवीस रुपये रोख असं बक्षीस असलेली ही दहीहंडी शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पाच थर लावून फोडली..
पाचल बाजारपेठरतील हॉटेल वैभव समोरच्या मैदानात आयोजित या उत्सवाला अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या अपूर्वाताई सामंत, व शिवसेनेचे प्रकाश कुळेकर यांच्या प्रमुख उपस्थिती हा उत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशी मित्र मंडळ पाचल चे संदीप बारस्कर, सुरेश ऐनारकर,सचिन पांचाळ, वैभव वायकूळ, सुनील गुरव, महेश रेडीज, हर्षद तेलंग, राजू तेलंग, जगदीश उर्फ सोनू पाथरे, राजू तेलंग, निलेश बांधनकर, चैतन्य पाथरे, मंगेश पांचाळ, गणेश तेलंग, मंदार नारकर, संदीप परटवलकर, संदीप गुरव, राहुल गोसावी, पुष्पक तेलंग, सिद्धेश गांगण, युवराज मोरे, रुपेश बांदरकर यांनी विशेष मेहनत घेतली

