(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
तालुक्यातील कडवई येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कडवई बाजारपेठ येथे परंपरेनुसार सार्वजनिक झेंडावंदन करण्यात आले. तसेच रिक्षा संघटनेच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली.
कडवई बाजारपेठ येथे परंपरेनुसार प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. याहीवर्षी बाजारपेठ येथे सार्वजनिक झेंडावंदन करण्यात आले. यावेळी सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाईशा घोसाळकर हायस्कुल व महाराष्ट्र उर्दू हायस्कुल चे विद्यार्थी, शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी, रिक्षा व्यवसायिक, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते सादर केली. भर पावसातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले.
रिक्षा मालक चालक संघटनेच्या वतीने तुरळ, कडवई ते चिखली अशी प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी ध्वनिक्षेपकावर देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. त्यामुळे वातावरण देशभक्तीपर झाले होते. प्रभातफेरीमध्ये शंभरहून अधिक रिक्षा सहभागी झाल्या होत्या. प्रभातफेरीनंतर रिक्षाव्यवसाईकानी बाजारपेठ येथील झेंडावंदनामध्ये सहभाग नोंदवला. अशारीतीने जोरदार पाऊस असूनही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
फोटो : रिक्षसंघटनेच्या वतीने काढण्यात आलेली भव्य प्रभातफेरी

