(संगमेश्वर / वार्ताहर)
साखरपा येथील पत्रकार आणि युवा सामाजिक कार्यकर्ते भरत माने यांची मानवाधिकार अर्थात ह्यूमन राईट असोसिएशन च्या संगमेश्वर उपतालुकाप्रमुख म्हणून निवड झाली आहे. साखरपा परिसरातील अन्यायग्रस्त लोकांसाठी काम करणाऱ्या श्री.माने यांनी कोरोना काळातही मोठे काम करुनं अनेकांचा जीव वाचवला होता.
पत्रकारितेची पदवी संपादन करून समाजकारणाची सुरुवात करणाऱ्या भरत माने यांना त्यांचे वडील श्री बंड्या माने तसेच काका माजी सभापती श्री जया माने यांचे मार्गदर्शन लाभले. तेजस भोपाळकर, वनकर गुरुजी, मुबीन मालगुंकर, सुलतान हफसांनी, शंकर लाड, शिवा पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्यरित्या जबाबदारी पार पाडणार असल्याचे श्री भरत माने यांनी सांगितले. भरत माने यांची उपतालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल तालुकाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

