(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख जवळील किरदाडी गावाच्या जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती अंजिरा सिताराम पेडणेकर यांचा १००वा (शतकोमहोत्सव) वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहात किरदाडी येथील घरी साजरा करण्यात आला.
श्रीमती अंजीरा पेडणेकर या मनमिळाऊ व परोपकारी वृत्तीच्या असून त्या १००वर्षे झाली तरी अजून (आवाज, दृष्टी, कान) खणखणीत आहेत. त्यांना कसलाही आजार नाही. कुठल्याही औषध गोळ्या चालू नाहीत. अजूनही त्या परावलंबी नाहीत. त्यांनी आपल्या शेतीवाडीकडे लक्ष देत सामाजिक भान जपत पंचक्रोशीतील विविध कार्यक्रमात भाग घेत अनेकांना मदतीचा हात देत असतात. त्या उत्तम गृहीणी म्हणून ही प्रसिद्ध असलेने गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जेवणावळींची जबाबदारी पार पाडत असत.
अशा या जून्याकाळातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेल्या अंजिराआजी पेडणेकर १०० वर्षाच्या होत असल्याने त्यांचा शतकोमहोत्सव पेडणेकर व बने कुटुंबीयांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. रात्री करावके फेम गायक मनोज ठीक व अभिरुची देवरूख गृपच्या बहारदार संगीत मैफिलने सांगता झाली. यावेळी सुपुत्र आशा. रघुनाथ व नातु सरपंच सुबोध पेडणेकर, सुना, जावई, नातवंड, पंतवडे यांचेसह पेडणेकर व बने कुटुंबीय यांनी औक्षण करून केक कापला व आजींचा सत्कार केला
आजींना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बने, माजी आमदार सुभाष बने, राष्ट्रवादीेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, उद्योजक सुरेश कदम, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार, प्रसाद सावंत, आंबवचे माजी सरपंच बाळा माने, जनार्दन कांबळे, चंद्रकांत जाधव, योगेश शिंदे, उबाठा शिवसेना तालुका प्रमुख बंड्या बोरुकर, व्यापारी संघटनेचे बाबा सावंत, हनिफ हरचिरकर, शंकर शेट्ये, अभिरुची संस्थेचे आषिश प्रभुदेसाई, अप्पा आठल्ये, डॉ. माधव येलगुडकर. आदी मान्यवर उपस्थित होते.