( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे आयोजित शालेय व्हॉलीबॉल रत्नागिरी तालुकास्तरीय स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूल रत्नागिरीच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी चा पराभव करून प्रथम क्रमांक मिळवला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
विजयी संघामध्ये हफसा सिद्धीक हकीम, सफीरा तौफिक होडेकर, आरफा ताबीश सोलकर, ईफरा फैज बुडये, मलीहा मुबीन नेवरेकर, मेहरीन सिद्दिक जांभारकर, मरियम जफर वाडकर, नायफा निसार होडेकर, जुहा जुबेर सोलकर, शाहिदा सुहेल सोलकर, आयशा जमीर दर्वे, सलिना समीर सोलकर या खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले विजयी संघ व मार्गदर्शक शिक्षक शाहनवाज राजापकर व मैनुद्दीन भैरेवाडी यांचे आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक समीर गडबडे पर्यवेक्षिका रईसा मुजावर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो : विजय संघासोबत क्रीडा मार्गदर्शक शाहनवाज राजापकर, मुजकीर खतीब, तनवीर बागलकोटे आणि स्पर्धा आयोजक मंदार सावंत.

