(राजापूर)
तालुक्यातील अणसुरे येथील कोळंबी प्रकल्पावर कामासाठी जाणाऱ्या सात कामगारांचा जीव धोक्यात घालून बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी सुप्रो गाडीच्या चालकाविरुद्ध राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. १३ ऑगस्ट) सकाळी ९.१५ वाजता मिठगवाणे पारवाडी वळणावर घडला होता.
फिर्यादी आरोही अमोल जाधव (वय ३२, रा. वाघ्रण) यांच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपी चालक संतोष आबा नाचणेकर (रा. अणसुरे) यांनी पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात गाडीवरील ताबा गमावला. भरधाव व निष्काळजीपणे चालविलेली सुप्रो (एमएच-१० डीटी-१५५५) रस्त्याच्या मध्यभागी पलटी होऊन अपघात झाला. या घटनेत फिर्यादीसह सौ. शितल सोना जाधव (६०), सविता बबन जाधव (६०), प्रज्ञा प्रकाश इंगवले (५०), रंजना रविकांत राणे (४५), वंदना वसंत जाधव (४३), शिल्पा शिवाजी आगरे (५५) व चालक संतोष नाचणेकर (३८) हे किरकोळ व गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५०/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ६६/१९२ अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

