(रत्नागिरी)
श्रावण पौर्णिमेनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा रत्नागिरीतर्फे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचा कार्यक्रम सदानंद कांबळे यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला. या वेळी माजी श्रामणेर, केंद्रीय शिक्षक आणि जिल्हा सचिव एन.बी. कदम गुरुजी यांनी ‘महामंगल सूत्त मानवाचे मंगल कशात आहे?’ या विषयावर प्रवचन दिले.
आपल्या मधुर वाणीने कदम यांनी महामंगल सूत्ताची संकल्पना, धम्मचरणातील त्याचे महत्त्व आणि मानवी जीवनातील कल्याणाचे घटक याबाबत सखोल मार्गदर्शन केले. धम्म अनुयायींना जीवनमूल्यांवर आधारित साधना करण्याचा संदेश देत त्यांनी धम्ममार्गावर दृढ राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखेचे अध्यक्ष रविचंद्र कांबळे होते. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष आयु. सुरेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमास के. के. कांबळे, प्रणाली सावंत, सचिन शिंदे, डबरी, सौ. कांबळे, श्रीम. केदार तसेच गाव शाखेतर्फे राकेश कांबळे, देवदत्त कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

