(राजापूर)
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जि. प. आदर्श केंद्र शाळा रायपाटण क्रमांक १ ने यंदा सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. आर्यन गोपीनाथ नवरे (९७.५० टक्के), कु. साई महेश गांगण (९२.५० टक्के) आणि कुमारी तनिष्का योगेश ऐनारकर (९२.५० टक्के) यांचा समावेश आहे.
या परीक्षेसाठी शाळेतील एकूण आठ विद्यार्थी बसले होते. विशेष म्हणजे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कुमारी श्रावणी संतोष तळेकर (८७.५० टक्के), कुमारी दुर्वा मंगेश पराडकर (८६.२५ टक्के), कु. स्वरा यशवंत गुरव (८६.२५ टक्के), कु. दुर्वा किशोर गुरव (६७.५० टक्के) आणि कु. प्रणव प्रमोद नमसे (५८.७५ टक्के) यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल रायपाटण ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षिका सौ. नीलम थरवळ, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर गुरव व सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

