(दापोली)
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बुधवार ९ जुलै रोजी दापोली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांची भेट घेऊन पदवीधर शिक्षकांच्या वैतनतृटींची पुर्तता करणेसंबंधी निवेदन देण्यात आले.
वेतन त्रुटी निवारण समिती, २०२४ च्या अहवालातील वेतनश्रेणी आणि इतर शिफारशी स्विकारण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २ जून, २०२५ निर्गमित झाला असून, या शासन निर्णयानुसार पदवीधर शिक्षकांच्या वेतनावाढीतील त्रुटी दूर करून देय होणारी वेतन वाढ तात्काळ लागू करण्यात यावी. तसेच संबंधित पदवीधर शिक्षकांना शासन निर्णयानुसार अनुषंगिक वेतनाचे लाभ लवकरात लवकर अदा करण्यात यावेत अशी संघटनेच्या वतीने निवेदन देत मागणी करण्यात आली.
यावेळेस अखिल शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय फंड, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र घुले, पदवीधर शिक्षक संजय मेहता, भुपेंद्र तलाठी, मनोहर सनवारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.