(राजापूर / तुषार पाचलकर)
शिवसेना कार्यकर्ते आणि तळवडे गावच्या सरपंच सौ. गायत्री साळवी यांचे पती श्री. अमित साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन तर्फे तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी शिवसेना पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी, विभागप्रमुख अमर जाधव, जगदीश उर्फ सोनू पाथरे, विहंग खानविलकर, प्रकाश कुवळेकर, दिपक सावंत, अनिकेत ताम्हणकर, गणेश खानविलकर, सर्वेश, बंधू चिले, अरविंद वरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पाचल गावचे सरपंच श्री. बाबालाल फरास, उपसरपंच श्री. आत्माराम सुतार, तळवडे सरपंच सौ. गायत्री साळवी, सामाजिक कार्यकर्ते श्री. आप्पा साळवी, सौ. दुर्वा तावडे यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. राजापूर-लांजा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी दुपारी २.३० वाजता शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत स्वीय सहाय्यक परेश खातू व रमजान गोलंदाज यांनीही रक्तदान केले.
शिबिराच्या अनुषंगाने छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच पाचल विभागासाठी आमदार किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या ॲम्बुलन्सचे लोकार्पणही यावेळी संपन्न झाले. या शिबिरात रक्तदान करण्याचा पहिला मान पाचलचे युवा उद्योजक जगदीश उर्फ सोनू पाथरे यांना मिळाला.