(संगमेश्वर / प्रतिनिधी )
सप्रे भक्त परिवार मुचरी यांच्या वतीने श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा चैत्र कृष्ण १३ शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी श्री स्वामींचे मठात आयोजित केला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम योजित केले आहेत. तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार, मित्रमंडळींसह अगत्य उपस्थित राहून उत्सव सुशोभित करावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यनिमित्त आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ८ वा. श्रींची पूजा व अभिषेक, दुपारी १२. वा.आरती-मंत्रपुष्प, श्रीदर्शन प्रार्थना, दुपारी १ ते ३ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. श्रींची पालखी मिरवणूक व आरती मंत्रपुष्प रात्रौ १० वा.भक्तीमय भजने. या सर्व कार्यक्रमाना भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन योगेश केरु सप्रे व्यवस्थापक सप्रे भक्त परिवार, मुचरी, ता. संगमेश्वर यांनी केले आहे. मठामध्ये अभिषेक व पूजाअर्चा केली जाते त्यासाठी तसेच देणगी किंवा अन्नदान देण्यासाठी कृपया उत्सव प्रमुखांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.