(मुंबई)
महाराष्ट्र शासनाने दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, काही महत्त्वाच्या प्रशासकीय पदांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. प्रशासकीय सेवेत कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित असलेल्या आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मंगळवारी सामान्य प्रशासन विभागानं याबाबतचे आदेश जारी केले. मुंढे यांच्या 20 वर्षांमधील ही 23 वी बदली आहे. ते आता दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
या आदेशानुसार:
-
तुकाराम मुंढे (IAS बॅच 2005), जे सध्या मुंबई येथील असंघटित कामगार विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते, यांची नियुक्ती मंत्रालय, मुंबई येथे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
-
नितीन काशिनाथ पाटील (IAS बॅच 2007), जे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते, यांची बदली विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
-
त्यांच्याजागी, अभय महाजन, जे सध्या विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून कार्यरत होते, यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.
-
ओमकार पवार (IAS बॅच 2022), जे सध्या इगतपुरी उपविभाग, नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांची नियुक्ती नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून करण्यात आली आहे.
-
आशा अफझल खान पठाण, ज्या सध्या मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर येथे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत, यांची वनामती (VANAMATI), नागपूर येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, त्या मुख्यमंत्री सचिवालयातील सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळणार आहेत.
तुकाराम मुंढे यांची अशी राहिली आहे कारकीर्द
1. ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
2. सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
3. जानेवारी 2008 – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर.
4. मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग.
5. जुलै 2009 – मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम.
6. जून 2010 – मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण.
7. जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना.
8. सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
9. नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी.
10. मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
11. मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
12. फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महानगरपालिका.
13. नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन.
14. डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
15. जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महानगरपालिका.
16. ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
17. जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
18. सप्टेंबर 2022 – आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
19. एप्रिल 2023 – सचिव, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
20. जून 2023 – सचिव, मराठी भाषा विभाग
21. जुलै 2023 – सचिव, कृषी व पशुसंवर्धन विभाग
22. जून 2024 – विकास आयुक्त, असंघटित कामगार विभाग (मुंबई)
23. ऑगस्ट 2025 – सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त, मंत्रालय