(खेड)
तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, खेड येथे विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न झाला. शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष कृष्णकांत मामा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षक संघ रत्नागिरीचे जिल्हा सचिव दीपक मोने, खेडचे अध्यक्ष तथा शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र चांदिवडे, माजी संचालक व अध्यक्ष संतोष उतेकर,जिल्हा सदस्य धर्मराज वाडकर – कृष्णा गंभीरे,कार्याध्यक्ष सुधाकर पाष्टे, कोषाध्यक्ष मंगेश झावरे यांच्यासह अखिल शिक्षक संघाचे राजेंद्र बेलोसे, शिक्षक भारतीचे परेश खोपडे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष आशिष उतेकर, दिव्यांग संघटनेचे संजय साळुंखे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गुणगौरव सोहळ्यात सेवानिवृत्त झालेले शिक्षक,विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, नासा इस्रो निवड चाचणी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, प्राथमिक शिक्षकांचे गुणवत्ता धारक पाल्य, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी, गुणवत्ताधारक शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर पदवी मिळालेल्या प्रियंका सवाईराम यांचा देखील सन्मान करण्यात आला. जवळजवळ 130 पेक्षा जास्त मुलांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.
या सत्कारामुळे मुलांना नवी प्रेरणा मिळेल, असे विश्वास जिल्हा कोषाध्यक्ष श्री.संतोष उतेकर यांनी व्यक्त केला. याबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल तुगावकर, विजय सकपाळ, गणोजी माने, तानाजी पाटील, संतोष जाधव, संजय जाधव, चंद्रकांत रेवाळे, संदीप घाणेकर, प्रमोद म्हादे, शरद कदम अशा सर्व शिक्षक संघाच्या सभासदांनी सहकार्य केले.अंकुश चव्हाण यांनी उत्कृष्ट फोटोग्राफी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस एकनाथ पाटील यांनी केले.