(खेड)
तालुक्यातील देवसडे गावात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यद्नेश चंद्रकांत कदम (वय ३५, सध्या रा. वि.२१ एव्हर शाईन सिटी, वसई (पूर्व), जि. पालघर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या चंद्रकांत चंद्रज्योती पॅलेस समोरील अंगणात ठेवलेले सुमारे ३५ ते ४० काळे चिरे (दगड) तिघांनी त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेले होते.
संशयित आरोपी म्हणून सुधिर यशवंत कदम, सारीका सुधीर कदम आणि सुचिता सुधीर कदम (सर्व रा. कदमवाडी, देवसडे, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२५ अन्वये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७९ व ३४ अन्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
चोरीची घटना २२ मे २०२३ रोजी सकाळी सुमारास घडली असून, तक्रारदाराने विलंबाने, २६ एप्रिल २०२५ रोजी तक्रार दिल्यामुळे गुन्हा उशिरा नोंदवण्यात आला आहे. चोरी गेलेल्या चिर्यांची अंदाजे किंमत सुमारे ३००० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.