(खेड)
खेड तालुक्यातील बहुतांशी प्राथमिक शिक्षक केंद्रस्तरीय मतदान अधिकारी(बी. एल.ओ.) म्हणून काम करत आहेत. खेड तालुक्यातील सर्व बी. एल. ओ. यांनी फार चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल नुकताच तहसीलदार सोनवणे यांच्याकडून सर्व बी एल. ओ. यांचा सन्मान करण्यात आला.
मात्र नुकत्याच काही शिक्षकांना मतदान केंद्रापासून दूरच्या शाळेमध्ये कामगिरी म्हणून आदेश देण्यात आले आहेत वरिष्ठांच्या आदेशानुसार असे शिक्षक त्यांच्या मतदान केंद्रापासून दूरवरच्या शाळेमध्ये काम करत आहेत. त्यामुळे ज्या मतदान केंद्रावर त्यांची बि.एल. ओ म्हणून नेमणूक झालेली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊन काम करणे सदर शिक्षकांना त्रासदायक ठरत आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड च्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खेड नायब तहसीलदार सिनकर साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले.
तहसीलदार सोनवणे साहेब यांच्याशी चर्चा करून बी. एल. ओ. शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन त्वरित मार्ग काढण्याचे आश्वासन सिनकर साहेब यांनी दिले.
यावेळी संतोष चव्हाण श्रीकृष्ण खांडेकर धर्मपाल तांबे सुनील दळवी अनिल यादव नवनीत घडशी नरेश ठोंबरे अजित भोसले शैलेश पराडकर परशुराम पेवेकर दिलीप यादव बबन मोरे ज्ञानेश्वर डिंबळे मधुकर साळवे मोहन मानेटवार विशाल सोनवलकर अनुराधा शिंदे उपस्थित होते.