( दापोली )
डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील बी.एस्सी.ऑग्रिकल्चरच्या विद्यर्थिनीनी ‘ग्रामीण जनजाग्रुती कार्यानुभव (RAWE)’ कार्यक्रमाअंर्तगत मळे गावात कार्यरत असलेल्या कृषी जीविका व पर्णमही गटांच्या वतीने गावातील जि .प. पू.प्रा.आदर्श मराठी शाळा, मळे येथे रानमाया रानभाजी प्रदर्शन व त्यापासून पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास गावचे सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश आडविलकर, उपसरपंच श्री. जयंत जाधव, कृषी महाविद्यालय, दापोलीचे कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सचिन पाठक सर, डॉ रणजित महाडिक सर, कार्यक्रम अधिकारी डॉ आशिष शिगवण सर, डॉ. मंदार पुरी सर, रावे प्रोग्राम ऑफिसर डॉ. प्रविण झगडे सर, मंडळ कृषी अधिकारी, दाभोळ( कृषी विभाग महाराष्ट्र शासन) श्री. रविंद्र मंचरे, सहाय्यक कृषी अधिकारी सौ. चंदा सावके मॅडम, जि.प. पू प्रा. आदर्श शाळा, मळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिनेश चिपटे सर व शाळेतील शिक्षकवृंद यांची उपस्थिती लाभली.
रानमाया रानभाजी प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. दिनेश आडविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विविध रानभाज्यांचे माहितीफलकासह प्रत्यक्षदर्शी नमुन्याचे सादरीकरण करण्यात आले होते. महिलांनी पारंपरिक रानभाज्यांपासून तयार केलेल्या पथ्यकर व चविष्ट पदार्थांची पाककृती स्पर्धेत सादरीकरण केले. २० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला, तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनीही रानभाज्यांविषयी माहिती घेण्यात उत्साह दाखवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. सावके मॅडम व सौ. पेवेकर मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी चव, पोषणमूल्य, सादरीकरण आणि नाविण्यता या निकषांवरून मूल्यांकन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत रावेच्या विद्यार्थिनींनी रानफुलांपासून बनवलेले पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.मंदार पुरी सर यांनी केली. त्यात त्यांनी नमूद केले की, आजचा हा कार्यक्रम केवळ चविष्ट पदार्थांची स्पर्धा नसून, आपल्या पारंपरिक ज्ञानाचे, आरोग्यदायी खाद्यसंस्कृतीचे आणि स्त्रियांच्या कौशल्याचे प्रदर्शन आहे. परिक्षकांनी अनुभव कथन करून रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व विशद केले. यावेळी त्यांचे “जे वनात, ते जेवणात” ही उक्ती विशेष लक्षणीय ठरली.
कार्यक्रमादरम्यान डॉ. पाठक सर, श्री.मंचरे सर, श्री.चिपटे सर आणि डॉ.महाडिक सर यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी श्रावण महिन्यात कोवळ्या रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी गुणधर्म स्पष्ट करत या भाजींपासून होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. पाककृती स्पर्धेचा निकाल डॉ प्रविण झगडे सर यांनी घोषित केला.
स्पर्धेच्या निकालांमध्ये पुढील महिलांनी क्रमांक पटकावले – प्रथम क्रमांक – सौ. आस्था सुजय आडविलकर, द्वितीय क्रमांक – सौ. वृषाली दिनेश आडविलकर तृतीय क्रमांक (विभागून) सौ. चंद्रकला तेलप व सौ. अनिता हरिश्चंद्र फिलसे.
शेवटी अध्यक्ष मा. दिनेश आडविलकर यांचे समारोप भाषण झाले. त्यांनी RAWE कार्यक्रमातील विद्यार्थ्यिनीचे कौतुक करत गावात राबवलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला. हा कार्यक्रम समृद्ध खाद्यपरंपरा, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सशक्तीकरणाचा सुंदर संगम ठरला.