(दापोली)
दापोली कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील केळशी येथे कार्यरत असलेल्या इंद्रधनू गटाच्या विद्यार्थिनींनी जगदीश कुळे यांच्या इथे मूरघास बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना मूरघास बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. यासाठी पाणी – ०.५ लिटर, गूळ – २०० ग्रॅम, मीठ – ५० ग्रॅम, युरिया – ५० ग्रॅम याचे द्रावण करण्यात आले. त्यानंतर १० किलो गवत जमा करून त्याचे लहान तुकडे केले. एका सिलो बॅग मध्ये ताज्या बारीक केलेल्या गवताचा थर भरला आणि त्यावर तयार केलेला द्राव शिंपडला आणि ही प्रक्रिया सुरू ठेवली. नंतर ती बॅग दाबून बंद केली जेणेकरून हवेचा प्रवेश होणार नाही आणि ती घट्ट बांधली जाईल.
२-३ महिन्यांनी पिशवी उघडावी आणि मूरघास गुरांना खाण्यास द्यावे असे शेतकर्यांना समजावून सांगण्यातआले. शेतकऱ्यांना मूरघास ची पोषणमूल्ये, पशुखाद्यातील वापर, दूध उत्पादन वाढवण्यातील भूमिका व त्याचा उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी डॉ. नरेंद्र प्रासादे यांचे मार्गदर्शन लाभले.

