(गणपतीपुळे / वैभव पवार)
केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतात सुरू असलेल्या एक पेड माँ के नाम हे अभियान उत्साहात संपन्न झाले. या अभियानाच्या सुरुवातीला शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेत या अभियानाच्या बाबतीत या अभियानाचा उद्देश, इको क्लबचे महत्व, एक पेड माँ के नाम या अभियानाची कार्यवाही कशी करावी याबाबत सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. माधव अंकलगे यांनी सभेला दिली. त्यानंतर शाळा परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने जनजागृतीपर बोर्ड देण्यात आला. त्यासह विद्यार्थ्यांनी आपल्या आयच्या नावाचे बोर्ड तयार केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावे झाडे लावण्याचा आणि त्या झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.
शाळेतून दिलेल्या सूचनेनुसार, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांच्या उपस्थीतीत एक पेड माँ के नाम अभियानातर्गत आपापल्या घरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. एक आठवडाभर चाललेल्या या अभियानात शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी झाडे लावून त्याचे फोटो इको क्लब फॉर मिशन लाईफ या ठिकाणी अपलोड केले. त्यानुसार या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सरव झाडे लावण्यात आली असून, त्याचे संवर्धन होण्यावर शाळेचा भर असणार आहे.
आजच्या वाढत्या प्रदूषण आणि बदलत्या पर्यावरणाच्या काळात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे, वृक्षारोपणाचे महत्व समजण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे मत शाळा विकास समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अप्पा धनावडे यांनी व्यक्त केले.
हा उपक्रम रत्नागिरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे, उपशिक्षक राधा नारायणरकर यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने संपन्न केला.