(रत्नागिरी)
शहरातील चर्मालय येथे एसटी आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातात राहुल सुरेश तेरवणकर (वय 36 रा कारवांचीवाडी) हा गंभीररीत्या जखमी झाला. आज सकाळी साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाला.
कोकण नगर वरून मारुती मंदिर दिशेने येणारी सिटी बस आणि दुचाकी स्वार चंपक मैदान येथून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होता, यावेळी हा अपघात घडला. या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे.