(रत्नागिरी)
टिके, भातडेवाडी ( मुळ विजापूर) येथे राहणारे कंत्राटदार प्रकाश रूपसिंग राठोड (वय ३८) यांनी त्यांची पत्नी दोन मुलांसह ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी घरातून नापत्ता झाल्याबाबत नोंद पोलीस ठाण्यात केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश राठोड यांची पत्नी रेश्मा प्रकाश राठोड (वय ३५), तसेच दोन मुले प्रथमेश प्रकाश राठोड (वय ७) आणि राजेश प्रकाश राठोड (वय ५) हे सर्वजण ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडले व परत आले नाहीत. रात्री उशिरापर्यंत संपर्क न झाल्याने तसेच आजूबाजूला व नातेवाईकांकडेही त्यांचा ठावठिकाणा मिळाला नसल्याने प्रकाश राठोड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पोलीस स्थानकात केलेल्या नोंदीनुसार, रेश्मा राठोड यांची उंची ५ फूट, सडपातळ बांधा, गोरा वर्ण, काळे लांब केस, गुलाबी रंगाची साडी, पायात चप्पल, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र असे आहे. डाव्या हाताचे अंगठ्यावर इंग्रजीमध्ये पी अक्षर गोंदलेले आहे. त्यांच्यासोबत आयडिया कंपनीचा मोबाईल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना कळविण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात बी.एन. कदम (पोहेकॉ) यांनी केली असून, पुढील तपास सुरु आहे.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनाशी जुळणारी व्यक्ती किंवा माहिती मिळाल्यास तत्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तक्रारदारांनी नमूद केल्याप्रमाणे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, संबंधित माहिती मिळाल्यास संपर्क क्रमांक ०२३५२-२२२२२२,
९६८४७०८३१५, ९४२२९०११२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.

