(संगमेश्वर / एजाज पटेल)
लायन्स क्लब संगमेश्वरच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण आणि शपथविधी समारंभ धामणी (ता. संगमेश्वर) येथील हॉटेल द ड्राईव्ह इन येथे उत्साहात आणि उत्सवमूर्ती वातावरणात पार पडला. या सोहळ्यात रविकांत शिंदे यांनी अध्यक्ष, मनिष चोचे यांनी सचिव तर सतीश पटेल यांनी खजिनदार म्हणून २०२५–२६ या कार्यकाळासाठी शपथ घेतली.
कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे प्रांतपाल पीएमजेएफ लायन सुनील सुतार, मार्गदर्शक एमजेएफ लायन उदय लोध, झोन चेअरमन लायन डॉ. कृष्णकांत पाटील, आणि लायन महेश उपळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रांतपाल लायन सुनील सुतार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, संगमेश्वर शाखेची नविन कार्यकारिणी समाजाच्या सेवा कार्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, याची खात्री आहे.”
पूर्व अध्यक्ष एमजेएफ लायन सुशांत (रिंकू) कोळवणकर, सचिव मनोहर पटेल आणि खजिनदार विवेक शेरे यांनी आपल्या कार्यकाळातील जबाबदाऱ्या नव्या कार्यकारिणीकडे औपचारिकपणे सुपूर्त केल्या.
नवीन कार्यकारिणी २०२५-२६:
अध्यक्ष: लायन रविकांत शिंदे
सचिव: लायन मनिष चोचे
खजिनदार: लायन सतीश पटेल
टेमर: दादा सैतवडेकर
टेल ट्विस्टर: बापूसाहेब भिंगार्डे
GLT व फर्स्ट व्हीपी: लायन विवेक शेरे
GMT: लायन सुशांत कोळवणकर
GST: लायन राजा भिंगार्डे
GAT: लायन रविकांत भिंगार्डे
डायरेक्टर्स: लायन दादा सैतवडेकर, लायन बापू भिंगार्डे, लायन महेश उपळेकर, लायन नेहा संसारे, लायन विवेक शेरे, लायन गुलाम पारेख
मार्केटिंग व कम्युनिकेशन: लायन गुलाम पारेख
LCIF: लायन सुशांत कोळवणकर
क्लब अॅडमिनिस्ट्रेशन: लायन गुलाम पारेख
अध्यक्ष लायन रविकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “नवीन कार्यकारिणीच्या सहकार्याने येत्या वर्षात क्लबच्या कार्याचा विस्तार आणि अधिकाधिक समुदाय सहभाग वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येतील.”
कार्यक्रमात लायन्स क्लब सदस्य, पत्रकार, आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष सन्मान म्हणून सचिव लायन मनिष चोचे यांची मुलगी अनुष्का (एमडीएस), तसेच रोनित सैतवडेकर व शार्दूल पाटणे यांना शैक्षणिक यशाबद्दल भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अमोल पाठणे यांनी केले तर मनिष चोचे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.