(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
वांझोळे गावचे सुपुत्र आणि सध्या सरफरे विद्यालय, बुरंबी येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. प्रदीप कृष्णा शिवगण आणि त्यांच्या कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी “गणेश दर्शन” हा विषय घेऊन देखावा साकारला आहे.
हा देखावा पूर्णपणे पुठ्ठ्यांपासून तयार करण्यात आला असून, त्यामध्ये मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंदिरात गणपतीचे प्रिय वाहन मूषक आणि त्याची भार्या (सौभाग्यवती) हातात हार व आरतीचे ताट घेऊन नित्यपूजेसाठी आलेली, अशी कल्पक रचना साकारण्यात आली आहे. चलचित्र भासणारा हा देखावा पाहणाऱ्यांना भावविभोर करणारा ठरत आहे.
हा देखावा तयार करण्यासाठी सुमारे ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागला. या उपक्रमात श्री. प्रदीप शिवगण यांना वडील कृष्णा शिवगण, बंधू प्रकाश शिवगण, वहिनी कांती शिवगण, पुतणे दर्शन व प्रतीक, तसेच पत्नी आराध्या शिवगण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

