(संगमेश्वर / एजाज पटेल)
लायन्स क्लब ऑफ संगमेश्वरच्या लायनिस्टिक वर्ष 2025-26 साठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी लायन रविकांत शिंदे यांची सर्वानुमते निवड झाली असून, सचिवपदी लायन मनीष चोचे व खजिनदारपदी लायन सतीश पटेल यांची निवड करण्यात आली आहे. यावर औपचारिक शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे.
सदर पदग्रहण समारंभ दि. २५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, हॉटेल द ड्राइव्ह इन, धामणी येथे पार पडणार आहे. या समारंभासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून MJF लायन सुनील सुतार यांना आमंत्रित करण्यात आले असून, प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल MJF लायन उदय लोध हे उपस्थित राहणार आहेत.
नवीन अध्यक्ष लायन रविकांत शिंदे यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांना शुभेच्छा दिल्या असून आणि संघभावना राखून समाजोपयोगी कार्य हाती घेण्याचा विश्वास व्यक्त केला. “निड-बेस्ड ॲक्टिव्हिटी”वर भर देत, लायन्स क्लब संगमेश्वरच्या कामगिरीसाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच एक ॲक्शन प्लॅनच्या आधारे नियोजनबद्ध उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लायन्स क्लब संगमेश्वर 2025-26 साठी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष – लायन रविकांत शिंदे
सचिव – लायन मनीष चोचे
खजिनदार (ट्रेझरर) – लायन सतीश पटेल
टेमर – लायन दादा सैतवडेकर
टेल ट्विस्टर – लायन बापूसाहेब भिंगार्डे
GLT व प्रथम उपाध्यक्ष (1st VP) – लायन विवेक शेरे
GMT – लायन सुशांत कोळवणकर
GST – लायन राजा भिंगार्डे
GAT – लायन रविकांत शिंदे
डायरेक्टर्स –
लायन दादा सैतवडेकर
लायन बापू भिंगार्डे
लायन महेश उपळेकर
लायन नेहा संसारे
लायन विवेक शेरे
लायन गुलाम पारेख
मार्केटिंग व कम्युनिकेशन –
लायन गुलाम पारेख
LCIF समन्वयक – लायन सुशांत कोळवणकर
क्लब ॲडमिनिस्ट्रेशन – लायन गुलाम पारेख