मुंबई विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यापीठाशी संलग्न राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या इंजिनिअरींग व एम एम एस विभागाने उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे.
महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनियरिंग ह्या विद्याशाखेमधून सर्वच्या सर्व ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ह्या शाखेचा निकाल १०० % इतका लागला आहे. त्यामध्ये अभिषेक बाबाजी भुवड ९.३४ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम आला आहे. तर सायली डांगे ९.०८ पॉइंट मिळवून दुसरी आणि यश सावर्डेकर ८.८९ पॉइंटसह तिसरा आला आहे. यामध्ये अभिषेक बाबाजी भुवड, सायली डांगे यांची कॅम्पसमधून जप्फा कॉम्फिड मध्ये तर यश सावर्डेकरची किरण अॅकॅडेमी पुणे कंपनीमध्ये निवड झाली आहे.
तसेच मेकॅनिकल इंजिनीअरिंग व ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग ह्या शाखेचा निकाल ६७.८५ % इतका लागला असून मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेचा स्मित मंगेश संसारे ८.८० पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम, तेजस चव्हाण ७.९४ पॉइंट मिळवून दुसरा, तर साक्षी सातोसे ७.८६ पॉइंटसह तिसरी आली आहे. यामध्ये स्मित संसारे याची झेड ट्रिक इंडिया प्रा. लि. पुणे, तेजस चव्हाण याची एनकॉन सिनर्जी, साक्षी सातोसे हिची आर ए ग्लोबल सोलुशन मुंबई कंपनीमध्ये निवड झाली आहे. तर ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमधील अथर्व संदीप पेठे ७.०८ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम आला असून त्याची अॅड्रॉइड एन्टरप्राईज पुणे या कंपनीमध्ये निवड झाली आहे.
एम एम एस या महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागाचा निकालही हाती आला असून तो ९०.३२ % इतका आहे. त्यामध्ये तनया राजेंद्र शिगवण ८. ७३ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम, प्रतिक कांबळे ८.६४ पॉइंटसह दुसरा, तर यश लिमये ८.१३ पॉइंटसह तिसरा आला आहे. यामध्ये तनया शिगवण हिची इंफिगो आय केअर तर यश लिमये याची इट्राव टेक लि. मुंबई या कंपनीमध्ये निवड झाली आहे. महाविद्यालयाचा एकत्रीत निकाल ८८.७२ टक्के इतका लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत, परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी व प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
हे महाविद्यालय कोकण विभागातील प्रथम एन बी ए मानांकनप्राप्त असून मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाला पुढील तीन वर्षांसाठी NBA मानांकन मिळाले आहे. तसेच दुसऱ्यांदा झालेल्या नॅक मुल्यांकनामध्ये बी ++ ग्रेड प्राप्त झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सर्वेक्षण यादीमध्ये सलग आठव्यांदा स्थान प्राप्त केले आहे. या सर्वेक्षणानुसार हे महाविद्यालय महाराष्ट्रात २८ व्या तर मुंबई विद्यापीठात सातव्या क्रमांकावर मानाकीत झाले आहे.
महाविद्यालयाने ए आय सी टी इ – सीआय आय ने २०१६, २०१७ तसेच २०२० यावर्षी घेतलेल्या सर्वेक्षणात सुवर्ण श्रेणी प्राप्त केली होती. तसेच २०१८ चा आय एस टी इ चा बेस्ट कॅंपस अवॉर्ड या महाविद्यालयाने पटकावला होता. ‘आर वर्ल्ड इंस्टीट्युशन रँकिंग’ मध्येही महाविद्यालयाने स्थान मिळविले होते.
महाविद्यालयाचा परिसर हा तब्बल ३१ एकर मध्ये पसरलेला असून, उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक, अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य लॅबोरॅटरी आणि विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न हि महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नियमितपणे ऍप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूचे प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते. या सर्व एकत्रित प्रयत्नांमुळेच महाविद्यालयाचा वार्षिक निकाल उत्तम असून विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश प्राप्त होत आहे.
नुकत्याच संपलेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये विविध विभागातील जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थी कॅम्पसमधून एक्स्पर्ट कंट्रोल अँड इन्फोटेक मुंबई, आर ए ग्लोबल सोलुशन्स मुंबई, अॅड्रॉइड एन्टरप्राईज पुणे, प्लेक्सीमस इंडिया, एमिरेट्स सोलुशन, पोलाड स्टील, सिक्लूम इंडिया लि., जप्फा कॉम्फिड, क्यू स्पायडर यासारख्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.