नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून घेण्यात आलेल्या यूजीसी नेट (UGC NET) जून 2025 सत्र परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेत भाग घेतला होता, ते आता NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर ugcnet.nta.ac.in आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात. सुमारे महिनाभर निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एनटीएने 21 जुलैच्या सायंकाळी अधिकृतरित्या निकाल जाहीर केला आहे.
यूजीसी नेट जून सत्र परीक्षा 25 ते 29 जून 2025 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. तेव्हापासून निकालाविषयी उत्सुकता होती.
UGC NET स्कोअरकार्ड कसे डाउनलोड करावे?
निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना खालील चरणांचे पालन करावे लागेल:
- ugcnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
- होमपेजवरील “Latest News” विभागात “UGC NET June 2025 Scorecard/Result” या लिंकवर क्लिक करा
- अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका
- “Submit” बटणावर क्लिक केल्यानंतर, स्क्रीनवर निकाल दिसेल
- तुमचे स्कोअरकार्ड तपासा आणि PDF स्वरूपात डाउनलोड करा
उमेदवारांनी निकालाची प्रिंटआउट प्रत भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवावी. तसेच निकालाशी संबंधित अधिक माहितीसाठी NTA च्या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देत राहा.