(रत्नागिरी)
भाट्ये समुद्रकिनारी बुधवारी दुपारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सदर महिलेचे नाव प्रज्ञा श्रीप्रकाश बिर्जे (वय ६५, रा. आरटीओ रोड, कुवारबाव, रत्नागिरी) असे आहे. भाट्ये गावातील नागरिक तहा काद्री आणि सरपंच पराग भाटकर यांना त्या महिला समुद्रकिनारी बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांनी तत्काळ त्या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, बुधवारी रात्री प्रज्ञा बिर्जे यांचा मुलगा चंदन बिर्जे यांनी त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले.