(रत्नागिरी)
स्मार्ट ग्रोथ अॅडव्हान्स कॉम्प्युटर कोर्सेसचे उद्घाटन कुवारबाव येथील गुरुसागर अपार्टमेंटमधील शॉप नं. ६ येथे सुरू झाले. स्मार्ट ग्रोथचे उद्घाटन एस. पी. हेगशेट्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. गवाले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाला एमकेव्ही इंग्लिश स्कूलच्या संचालिका नंदा शेलार यांच्यासमवेत स्मार्ट ग्रोथची तज्ज्ञ टीम सौ. भक्ती बांदीवडेकर (MBA HR), वसीम आवटे (Software Engineer), सौ. आवटे, नारायण बांदीवडेकर (MBA Finance, CA (Inter), B.Com) हे उपस्थित होते.
स्मार्ट ग्रोथ हे रत्नागिरीतील एकमेव टॅली सर्टिफाईड कॉम्प्युटर कोर्स सेंटर आहे. येथे अॅडव्हान्स्ड टॅली, पॉवर बीआय, एआय टूल्स आणि चॅट जीपीटीसारखे अत्याधुनिक कोर्सेस उपलब्ध आहेत. टॅली कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना थेट टॅली एज्युकेशनकडून प्रमाणपत्र मिळते, जे संपूर्ण भारतभर काही परदेशांमध्येही वैध आहे. स्मार्ट ग्रोथ विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरी सहाय्य पुरवते. येथील ट्रेनरला अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या क्षेत्रात सुमारे २० वर्षांचा अनुभव आहे, असे यावेळी बांदिवडेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना नवनवीन कॉम्प्युटर कोर्सेस प्रत्यक्ष अनुभवासह देणे हा स्मार्ट ग्रोथचा समावेश आहे. जीएसटी सिम्युलेशन, डेमो पोर्टल हे स्मार्ट ग्रोथतर्फे सुरू करण्यात आला आहे. या कोर्समुळे विद्यार्थी केवळ सिद्धांतात्मक जीएसटी नव्हे तर प्रॅक्टिकल पद्धतीने नोंदणी व आणि रिटर्न फायलिंग शिकतील. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यावसायिक जीएसटी फायलिंग सुरू करण्याची संधी मिळेल, अशी माहिती संचालकांनी या वेळी दिली.

