(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कार्यकारिणी व सर्व तालुक्यातील तालुका बेसिक कार्यकारिणी यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता शिवाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठक ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष आयु.प्रितम रुके यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा सरचिटणीस आयु.आदेश मर्चंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. तरी रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बेसिक कार्यकारिणी व सदस्य यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सरचिटणीस आयु.आदेश मर्चंडे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात केले आहे.