(रत्नागिरी / वार्ताहर)
माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी यांच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात आज रविवार २७ एप्रिल रोजी मत व्यक्त केले. पुढे बोलतांना ते म्हणाले, प्राथमिक शिक्षक हे देशाच्या शिक्षणाचा पाया रचतात, प्राथमिक शिक्षकांनी मला मराठी शिकवलं नसतं, तर आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नसता, असे सांगत एक काॅल प्राॅब्लेम साॅल्व्ह असे सांगत संघटनेच्या दोन मागण्यांची पूर्तता जाग्यावर केली.
राज्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी व अतिउत्कृष्ट गोपनीय अहवाल मिळालेल्या शिक्षकांना प्रलंबीत वेतनवाढ लगेच देण्यात येईल असे जाहीर केले. तसेच शिक्षकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली असल्याची सांगून, संघटना कितीही झाल्या तरी, उद्दिष्ट एकच असावे, शिक्षकांसाठी भरीव काम संघटनेकडून व्हावे आपल्या कार्याची शासन निश्चित दखल घेते. उदंड संघटना तयार करुन शिक्षकांची अडचण होते. शिक्षकांचे हित जोपासले पाहिजेत. शिक्षकांच्या अडी अडचणीवर सरकारने मात केलीच पाहिजे या मताचे आपण असल्याचेही पुढे सामंत यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांवर चांगले पैलू पाडतात. पालकांपेक्षा प्राथमिक शिक्षकांची जबाबदारी श्रेष्ठ आहे. CBSC मुळे आपली मुले इंग्रजी माध्यमातील मुलांपेक्षाही गुणवत्ता सिध्द करतील. तेव्हा पालकांचा खाजगीकडे असलेला कल आपोआप बंद होईल. हिंदीची सक्ती कमी केली असून, आपली मानसिकता बदलली पाहीजे. देशभक्ती, राष्ट्रभक्तीची मूल्ये प्राथमिक शाळेतूनच रुजवली जातात, शिक्षकांच्या चांगल्या कामासांठी तुमचा पालकमंत्री सदैव तुमच्यासोबत आहे असे सांगूण सर्व मागण्यांची लवकरच केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली.
तर संघटनेचे राज्याध्यक्ष देविदास बसवदे यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतांना आपण भाग्यवान आहोत, अशैक्षणिक कामामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होत असल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांचेसोबत बैठक घेऊन येत्या जूनपासून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सारखेच उपक्रम असावेत यासाठी प्रयत्न करु, मागण्यांदर्भात जर निर्णय रद्द झाला नाही तर अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना कोर्टात जाण्याच्या तयारीत असून लवकरच केस दाखल केली जाईल. शिक्षण सेवक पद रद्द करणे त्याचबरोबर जूनी पेन्शन मिळवणेसाठी अखेरपर्यंत लढा दिला जाईल. चळवळीच्या माध्यमातून १९१० ला स्थापन झालेल्या या संघटनेचा इतिहास असल्याचे बसवदे यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष प्रविण काटकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सोहळ्यात नवी जिल्हाकार्यकारीणी जाहीर करणेत आली असून, त्यामध्ये दिलीप देवळेकर -जिल्हाध्यक्ष, भालचंद्र घुले जिल्हा सरचिटणीस, शांताराम पवार- जिल्हा कार्याध्यक्ष, सुखदेव पवार – जिल्हा कार्याध्यक्ष, तर रमाकांत शिगवण -शिक्षक नेते, क्षमा गावकर महिला आघाडीप्रमुख अशी निवड झाली.
यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेला शुभेच्छा देश वाचन करणेत आला. प्रास्ताविक नुतन जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी तर सुत्रसंचालन प्रवीण सावंत व वैभव बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन मावळते सरचिटणीस संतोष देवघरकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्ह्यातून अनेक शिक्षक उपस्थित होते. यावेळी पुरस्कार प्राप्त शाळा व शिक्षक यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.

