( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
तालुका कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी सन 2025 च्या दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष श्री सुनील साळवी देवरुख व जिल्हा संघटक श्री निलेश कुंभार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी युवा आघाडी तालुका अध्यक्ष श्री प्रथमेश साळवी , उपाध्यक्ष श्री सुरज कुंभार, सचिव श्री प्रणय कुंभार, खजिनदार श्री गणेश साळवी, जिल्हा खजिनदार श्री प्रतीक साळवी, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष श्री निलेश तुळसनकर, सोशल मीडिया उपाध्यक्ष श्री अनिकेत साळवी क्रिकेट कमिटी पदाधिकारी नितेश गवंडी ,तुषार साळवी तसेच प्रमोद गवंडी ,अमोल कासेकर विनोद साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.