(लांजा)
लांजा नगर पंचायत हद्दीतील कनावजेवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीतून भीड धातूच्या ३१ वजनदार प्लेटा चोरीला गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. नगर पंचायतीच्या संमतीशिवाय ही चोरी झाल्याने स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली असून, याप्रकरणी दोन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रविंद्र विजय कांबळे (वय ४३, रा. लांजा बौद्धवाडी, ता. लांजा) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सुमारे दोन महिन्यांपासून ते १४ जुलै २०२५ रोजी सकाळी १२.३० वाजेच्या सुमारास या चोरीचा उलगडा झाला. सदर ३१ प्लेटा, प्रत्येकी किंमत १,००० रुपये, एकूण ३१,००० रुपयांचा माल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या चोरीत दोन आरोपी सहभागी असल्याचा संशय असून, त्यापैकी एकाने काळा शर्ट परिधान केला होता (लिंगायत गुरव) तर दुसरा आरोपी अनंत रेवाळे (वय ३५, रा. गवाणे रेवाळेवाडी, ता. लांजा) असून, त्याने पिवळा शर्ट घातलेला होता. या प्रकरणी गु.र.नं. १४०/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) नुसार लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

