(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे मधलीवाडी येथे जय चंडिका मित्र मंडळ, जय चंडिका महिला मंडळ आणि जय चंडिका क्रिकेट संघ यांच्या संयुक्त सहभागाने मोठ्या उत्साहाने व आनंदमय वातावरणात श्री चंडिका देवी व ग्रामदेवतांची मूर्ती स्थापन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच मंडळाचे गावकर विजय गोवळकर ,अध्यक्ष चिमाजी गोवळकर, उपाध्यक्ष उदय मांजरेकर, सेक्रेटरी सुरेश मांडवकर यांचा व विशेष जय चंडिका क्रिकेट यांच्या व जय चंडिका क्रिकेट संघाचा कर्णधार नरेश गोवळकर व त्याच्या सर्व टीमने व सर्व ग्रामस्थांच्या, महिलांच्या व रोहा तसेच मुंबईकर यांच्या विशेष सहकार्याने संपन्न करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी श्री चंडिका देवीच्या मूर्तीचे व देवतांचे आगमन व त्यांची ढोल पथक व महिलांच्या लेझीम तालावर मिरवणूक मंडळाने नीटनेटके नियोजन करून पार पाडली. 12 ऑक्टोबर रोजी देवतांचे चालन विधी व होमहवन स्थिर प्राणप्रतिष्ठापना विधी व दिनांक 13 ऑक्टोबर रोजी होमहवन व देवतांची स्थापना व महाआरती संपन्न झाल्या. दुपारी महाप्रसाद, हळदीकुंकू आणि विशेष कार्यक्रम माहेरवाशींचा मानपान मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
माहेरवशीनने प्रथम या ग्रामदेवताच्या साक्षीने या ठिकाणी मुलगी म्हणून जन्म घेतला. त्यानंतर ती कोणाची तरी बहीण झाली. जशी ती मोठी झाली तशी ती कोणाची पत्नी झाली. त्यानंतर ती आई झाली व आई झाल्यानंतर काही काळाने ती आजी झाली. त्यामुळे जय चंडिका मंडळाने या ठिकाणी १५० माहेरवाशींना सन्मानपूर्वक बोलावून त्यांना पुष्प व साड्या प्रधान करण्यात आल्या.यावेळी काही माहेरवाशिनी भावुक होऊन आपले मनोगत व्यक्त करत मंडळाने राबवलेल्याया स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून मंडळाचे आभार मानले.
या मंडळाच्या वतीने दानशूर व्यक्तींचे सन्मानचिन्ह व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. रात्री ठीक दहा वाजता नामांकित कार्यक्रम कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा तुफान प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच याच कार्यक्रमात इनफिगो रत्नागिरी यांचे वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.
सदर शिबिराचा लाभ चाफे गावातील अनेक गरजू नागरिकांनी घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाला वैभव गोवळकर, चंद्रकांत मांडवकर, नामदेव मांडवकर, सुनील मांजरेकर ,मंगेश मांडवकर, नारायण मांडवकर , अनंत गोवळकर, राजन गोवळकर ,भरत मांडवकर ,महादेव भुवड ,महेश मांडवकर आदींसह वाडीतील सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम श्री जय चंडीका मंडळाने व महिला मंडळ तसेच जय चंडिका क्रिकेट संघाने मेहनत घेऊन मोठ्या उत्साहाने,आनंदाने व नीटनेटके नियोजन करून संपन्न केला.

