( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तथागत भगवान बुद्धांनी सुरू केलेल्या ‘वर्षावास कार्यक्रमाला’ रत्नागिरी जिल्ह्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी, १० जुलै २०२५ पासून उत्साही सुरुवात होत आहे. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी आणि संस्कार विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा म्हणजेच १० जुलै ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.
या प्रवचन मालिकेचा उद्घाटन सोहळा संगमेश्वर तालुक्यातील कुळेवाशी येथील बुद्ध विहार येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय विजय जाधव (उपाध्यक्ष, संस्कार विभाग) असणार असून उद्घाटन अनंत सावंत (सचिव, संस्कार विभाग, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आद. विकास पवार तर सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ हे करतील.
मुख्य प्रवचन “गुरुपौर्णिमा व वर्षावासाचे महत्त्व” या विषयावर अनंत सावंत हे करणार असून ते आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत सखोल मार्गदर्शन करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून एन. बी. कदम (सरचिटणीस) आणि राहुल मोहिते (अध्यक्ष, तालुका संगमेश्वर) यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला प्रदीप जाधव (कोषाध्यक्ष), जनार्दन मोहिते (उपाध्यक्ष, प्रचार-पर्यटन), शरणपाल कदम (उपाध्यक्ष, संरक्षण), विजय कांबळे (कार्यालय सचिव), सुनील पवार (हिशोब तपासणी), तानाजी कांबळे (संघटक), सत्यवान जाधव (अध्यक्ष, राजापूर), आर. बी. कांबळे (अध्यक्ष, लांजा), विजय मोहिते (अध्यक्ष, रत्नागिरी), राहुल मोहिते (अध्यक्ष, संगमेश्वर), जयरत्न कदम (अध्यक्ष, चिपळूण), विद्याधर कदम (अध्यक्ष, गुहागर), अरुण मोरे (अध्यक्ष, खेड), अनिल घाडगे (अध्यक्ष, दापोली), हर्षद जाधव (अध्यक्ष, मंडणगड) व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा, तालुका व शहर पातळीवरील बौद्धाचार्य, श्रामणेर, केंद्रीय शिक्षक, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, रत्नागिरी जिल्ह्यात बुद्धविहारांमध्ये वर्षावास प्रवचन मालिका विविध ठिकाणी आयोजित केली जाणार आहे.