(संगमेश्वर)
रामपेठ आठवडा बाजार परिसरात मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी ओसंडून वाहू लागल्याने सकाळपासून बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली. बाजारात पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, अनेकांनी आपापला दुकानातील माल उचलण्यासाठी तातडीची धावपळ सुरू केली आहे.
या भागातील मराठी शाळा, अंगणवाडी आणि कोंड-असुर्डे मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. काही ठिकाणी पाण्याचा स्तर गुढग्यापर्यंत पोहोचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी ही अनावश्यक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमेश्वर देवरुख मार्गावर लोवले येथे पाणी भरल्याने वाहतूक कोंडी झाली असून संगमेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांची बुरंबी येथे रांग लागली होती. बुरुंबी- संगमेश्वर रस्ता सध्या बंद आहे. ताम्हाणे कोळंबे मार्गाने जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

