(पुणे)
पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी आहे. लवकरच पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. या नव्या सेवांमुळे पुण्याहून धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या सहावर जाणार आहे. सध्या पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या दोन मार्गांवर वंदे भारत सेवा सुरू आहे. यामध्ये आता आणखी चार नवीन मार्गांची भर पडणार आहे.
रेल्वे प्रशासनाने 28 डिसेंबर 2024 रोजी या सेवांची अधिकृत घोषणा केली होती. पुणे शहर हे पश्चिम भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, याठिकाणाहून अनेक प्रवासी दररोज विविध राज्यांमध्ये प्रवास करतात. त्यांची वाढती गरज लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गांवर?
1. पुणे–शेगाव वंदे भारत एक्सप्रेस
-
संभाव्य थांबे : दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना
-
टिकिट दर : अद्याप अधिकृत माहिती नाही
-
विशेष : मराठवाडा आणि विदर्भात जलद जोडणी साधणारी पहिली वंदे भारत सेवा
2. पुणे–वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस
-
संभाव्य थांबे : लोणावळा, पनवेल, वापी, सूरत, वडोदरा
-
प्रवासाचा वेळ : सध्याच्या सुमारे 9 तासांऐवजी 6-7 तासांपर्यंत
-
विशेष : महाराष्ट्र–गुजरातमधील व्यापार व व्यावसायिक प्रवाशांना दिलासा
3. पुणे–सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
-
संभाव्य थांबे : दौंड, सोलापूर, गुलबर्गा, सिकंदराबाद
-
प्रवासाचा वेळ : 2–3 तासांपर्यंत बचत
-
विशेष : महाराष्ट्र–तेलंगणा दरम्यान तांत्रिक, औद्योगिक आणि कौटुंबिक प्रवास सुलभ होणार
4. पुणे–बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस
-
संभाव्य थांबे : सातारा, सांगली, मिरज, बेळगाव
-
टिकिट दर : अंदाजे ₹1500–₹2000
-
प्रवासाचा वेळ : 2–3 तासांनी कमी होणार
-
विशेष : कर्नाटकमधील व्यापारी शहरांशी जलद संपर्क
जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवास
या चार नव्या वंदे भारत गाड्यांमुळे पुणेकरांना केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आधुनिक रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ही गाड्या पूर्णपणे वातानुकूलित असून, त्यामध्ये स्मार्ट ऑटोमेटेड दरवाजे, GPS आधारित सूचना, बायो-व्हॅक्युम टॉयलेट्स आणि वायफाय कनेक्टिव्हिटीसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत.
पर्यटन आणि उद्योगाला चालना
या नव्या मार्गांमुळे पुण्याशी जोडलेल्या शहरांतील पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल. विशेषतः शेगाव, सिकंदराबाद आणि बेळगावसारख्या शहरांमधील व्यवसायिक आणि धार्मिक प्रवास करणाऱ्यांसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे–नागपूर मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा प्रस्तावही पुढे ठेवला आहे, जो लवकरच अंतिम रूपात सादर होऊ शकतो. सर्व मार्गांसाठी अचूक वेळापत्रक, थांबे आणि तिकिट दरांविषयी अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.

