(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील दी मॉडेल इंग्लिश स्कुलचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांना भारतरत्न डॉ.ऐ. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सैतवडे येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सत्कारकरण्यात आला.
यावेळी सैतवडे ( गुम्बद ) सरपंच सौ. उषा सावंत, सैतवडेचे (बोरसई) साजीद शेकासन, जांभारीचे सरपंच आदेश पावरी, इरा इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक इमरान अंतुले, व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रहीम माद्रे यांनी बुके, शाल, भेटवस्तू तसेच सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी इमरान अंतुले, आदेश पावरी, सौ.उषा सावंत, रहीम माहे, राजेंद्र कदम व काही विद्यार्थ्यानीही यावेळी मनोगत व्यक्त केले. श्री कोळेकर सर यांनी मॉडेल स्कुल नावाप्रमांणेच मॉडेल शाळा केली आहे, सतत नव-नवीन उपक्रम,शाळेची वाढलेली गुणवत्ता, विद्यार्थ्यांची स्पर्धा उपक्रम तसेच. सर्वच ठिकाणी सुरु असलेली गरुडभरारी ही कौतुकास्पद आहे ,असे सर्वच मान्यवरांनी सांगून पुरस्कार विजेते विलासराव कोळेकर यांच्या कार्याचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना श्री. कोळेकर म्हणाले हे यश माझे नसून उत्तम सहकार्य करणा-या संस्थेचे, सर्वोत्तम अध्यापन करणा-या सर्व शिक्षकांचे, प्रयत्नवादी विद्यार्थ्यांचे, आणि प्रत्येक उपक्रमात हिरीरीने सहभाग घेणा-या पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आहे असे नमूद केले. तसेच पालकांप्रमाणेच परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे व नागरिकांचाही नेहमीच सहकार्याचा हात असतो, त्यामुळेच आज शाळेची चौफेर प्रगती झाल्याचे ते बोलले.
या समारंभास मकबुल पारेख, संस्थेचे सदस्य हशमत निवेकर, रज्जाक फकीर तसेच राजू सावंत आदी ही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुमान पारेख यांनी केले. सुत्रसंचलन विनोद पेढे यांनी केले, तर आभार अविनाश केदारी यांनी मानले.