(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पोलीस दलात व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टम (VMS), १० चारचाकी वाहने व १४ ई-बाइक यांचा लोकार्पण सोहळा व सायबर गुन्हे प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम उद्या दिनांक २०/०२/२०२४ रोजी ११.०० वाजता, वीर सावरकर नाट्यागृह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा लोकार्पण सोहळा व उद्घाटन समारंभ ना. उदय सामंत (मंत्री, उद्योग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, रत्नागिरी जिल्हा ) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याकरिता रत्नागिरी पोलीस दलामार्फत व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टम (VMS) प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच 10 चार चाकी वाहनांचा गुन्हे प्रतिबंध व पेट्रोलिंग करिता वापर व ई-बाइक च्या माध्यमातून सागरी गस्त घालण्यात येणार आहे. पर्यटक सुरक्षितता आणि दुर्घटना प्रतिबंध करिता याचा वापर होणार आहे.
या उद्घाटन समारंभ प्रसंगी ना. श्री. योगेश कदम, राज्य मंत्री, गृह(शहरे), महसूल, ग्राम विकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन यांची विशेष उपस्थिति असणार आहे. तसेच जिल्ह्यातील मान्यवर खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमा करिता विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे व श्री. एम देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी हे उपस्थित असणार आहेत. उद्घाटन समारंभा प्रसंगी सायबर जनजागृतीचे देखील प्रदर्शन होणार आहे. तरी, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संखेने उपस्थित राहावे अशी विनंती रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे.