(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा चार्ज पुन्हा तत्कालीन सरपंच सौ. प्रगती प्रमोद भोसले यांच्या हाती पुन्हा सुपुर्द करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजकीय विरोधकांच्या तक्रारीवरून सरपंचपदाच्या कामात कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत कोकण आयुक्त यांनी भगवतीनगरच्या सरपंच प्रगती भोसले यांना पदावरून काढून टाकले होते. त्यानंतर सरपंच पदाचा चार्ज उपसरपंच सौ. श्रेया श्रीकांत राजवाडकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र कोकण आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे केलेल्या अपिलामध्ये पहिल्याच तारखेला कोकण आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती आदेश मिळाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांनी सरपंचपदाचा कार्यभार पुन्हा सौ प्रगती भोसले यांचेकडे सुपूर्द केला.
याबाबतचे निकालपत्र भोसले यांनी यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे सादर केले होते. मात्र कोकण आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदकडे कोणतेही तसे पत्र न आल्याने सदरचा कार्यभार कोकण आयुक्त यांच्याकडील पत्रानुसार आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार सौ प्रगती भोसले यांना आज देण्यात आला आहे. यावेळी सरपंचपदाचा चार्ज पुन्हा हाती घेता घेताना गावातील बहुसंख्य ग्रामस्थ तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते. या सर्वांनी सरपंच भोसले यांचे जंगी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला करण्यात आला.
सरपंचपदाचा चार्ज पुन्हा हाती घेऊन गावातील रखडलेली सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे सौ. भोसले यांनी सांगितले. तसेच आपल्या विरोधात सूडबुद्धीने केलेल्या तक्रारींना कायद्याने आपण योग्य उत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण आज या खुर्चीत पुन्हा बसलो असल्याचे सरपंच सौ. भोसले यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमावेळी उबाठाचे तालुकाप्रमुख प्रकाश जाधव माजी पंचायत समिती सदस्य उत्तम मोरे, साईनाथ जाधव, रोहित साळवी, प्रमोद भोसले, वैभव घाग, सौ.सुनीता नेवरेकर, अक्षता सावंत,
सविता पवार, स्नेहलता आंग्रे, मेघा भोसले, संपदा भोसले, प्रणिता भोसले, सलोनी भोसले, विनायक दळवी यांचेसह अनेक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ नंदकुमार यादव, सुधीर जाधव, दीपक आगरे, प्रशांत भुते, अनिल भोजे, प्रवीण साळवी, सत्यविजय गोणबरे, , प्रकाश भोसले, विश्वनाथ निवेंडकर, विद्याधर डिंगणकर हजर होते.
असत्यावर सत्याचा विजय
मागील चार महिन्यांपूर्वी चुकीचे आरोप करून आणि सत्तेचा चुकीचा वापर करून सरपंच सौ.प्रगती भोसले यांना पदावरून हटवण्यात आले होते. कोल्हापूर हायकोर्टाने कोकण आयुक्त यांच्या निर्णयावर स्टे आणून पुन्हा एकदा सरपंच पदी सौ.प्रगती प्रमोद भोसले यांची फेरनिवड करून कायद्याची चपराक विरोधकांना बसवली आहे. तसेच असत्यावर सत्याचा विजय झाला असून एका सर्वसामान्य महिलेला न्यायालयाने सन्मानपूर्वक न्याय दिल्याची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी दिली.

