(देवरुख / प्रतिनिधी)
रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने व संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित १९ वी क्युरोगी व १३ वी पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा सन २०२६–२७ मध्ये ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉल, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या स्पर्धेत संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व गुहागर तालुक्यांमधून सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्यातील खेळाडूंची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. ही निवड नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष संदेश जागुष्टे तसेच प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमीत पवार आणि साईप्रसाद शिंदे उपस्थित होते.
संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब आणि लायन्स तायक्वांडो क्लबचे खेळाडू तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ओपन तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
जीवित देशपांडे, सई संसारे, शुभ्रा माळी, अनुराग यादव, निकुंज घडशी, स्वानंदी कांगणे, शौर्य माळी, सोमांश सावंत, पूर्वा वनकर, नक्षत्रा शिंदे, वेदांत मसुरकर, मल्हार साने, ईशान भागवत, ऋत्विक कांगणे, अफजान फुलारी, गंधार रेवडेकर, प्रभात रहाटे, पूर्वा रहाटे, मिहिका लाड, शौनक राजवाडे, रीतीशा कांगणे, ईश्वरी कांगणे, आदित्य चिपळूणकर, साहिल जागुष्टे, शुभ्रा सुर्वे, मंथन चव्हाण, अजिंक्य शिंदे, सोहम चव्हाण, गंधर्व शेट्ये, शरणी कोळवणकर, अवनी भिंगार्डे, वेद पटेल, प्रणित कांबळे, सुमीत पवार आदींचा समावेश आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष बने, देवरुख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ. पूनम चव्हाण, लायन्स तायक्वांडो क्लबचे अध्यक्ष दिलीप रहाटे, चिन्मय साने तसेच ज्येष्ठ खेळाडू व सर्व नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या.

