( मुंबई )
मराठी चित्रपटसृष्टीतील मानाचा ‘फिल्मफेअर मराठी २०२५’ पुरस्कार सोहळा गुरुवार १० जुलै रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडला. या दहाव्या पर्वात मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृतींचा आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याचं यंदाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी त्यांच्या मिश्कील शैलीत अतिशय रंगतदार पद्धतीने केलं.
‘फुलवंती’ ची सर्वाधिक सात पुरस्कारांसह बाजी
‘फुलवंती’ या चित्रपटाने एकूण सात प्रमुख पुरस्कार पटकावत यंदाच्या सोहळ्यात सर्वाधिक यश मिळवणारा चित्रपट ठरला. त्याच्या खालोखाल ‘पाणी’ या चित्रपटाने सहा पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.
मुख्य पुरस्कार विजेते:
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) – महेश मांजरेकर (‘जुनं फर्निचर’)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) – प्राजक्ता माळी (‘फुलवंती’) आणि वैदेही परशुरामी (‘एक दोन तीन चार’) – संयुक्त पुरस्कार
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आदिनाथ कोठारे (‘पाणी’)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता – क्रिटिक्स चॉईस – जितेंद्र जोशी (‘घात’)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिटिक्स चॉईस – राजश्री देशपांडे (‘सत्यशोधक’)
या झगमगत्या सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली, तसेच बॉलिवूडमधील राजकुमार राव, तब्बू, नवाजुद्दीन सिद्दीकी, आणि जयदीप अहलावत यांच्यासारख्या नामवंत कलाकारांचीही उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शान आणखी वाढली.