(नवी दिल्ली)
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये करण्यात आली. या पुरस्कारांसाठी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कडून प्रमाणपत्र मिळालेले चित्रपट पात्र होते. दिग्ददर्शक आशुतोष गोवारीकर यांनी जाहीर केल्यानुसार भाषिक चित्रपटात मराठीमधून “श्यामची आई” चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला आहे. तर विक्रांत मेस्सी अभिनीत 12th फेल चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरला आहे. तर अभिनेता शाहरुख खान याला जवान चित्रपटासाठी आणि अभिनेता विक्रांत मेस्सीला 12th फेल चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, आशिष बेंडे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आत्मपॅम्फलेट’ तसेच ‘नाळ २’ चित्रपटाला स्वर्ण कमळ पुरस्कार घोषित झाला आहे.
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जिप्सी या चित्रपटातील बाल कलाकार कबीर खंदारे तर त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे नाळ २ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. हिंदी चित्रपट १२ वी फेलला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ’१२ वी फेल’साठी विक्रांत मेस्सी यांना संयुक्तपणे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार जाहीर झाला. राणी मुखर्जीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
प्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांनी अनेक गाजलेल्या आणि यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘द केरळा स्टोरी’ (The Kerala Story) एक प्रभावी आणि ठोस कथानक असलेला चित्रपट आहे. ह चित्रपट प्रदर्शित होताच देशभरात खळबळ माजवून गेला. हिंदुत्वाशी संबंधित, “लव्ह जिहाद” या वादग्रस्त संकल्पनेवर आधारित असल्यामुळे तो अधिक चर्चेचा विषय ठरला. आता ‘द केरळा स्टोरी’ला मोठा सन्मान मिळाला आहे. ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये (2023) या चित्रपटाने दोन प्रमुख पुरस्कार पटकावले आहेत. प्रशांतनु मोहापात्रा यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तर दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा – श्यामची आई
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री – गॉड वल्चर अँड ह्युमन
सर्वोत्कृष्ट कल्चरल फिल्म – टाइमलेस तमिळनाडू
सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म – भागावान्थ केसरी
सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म – पार्किंग
सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म – गॉडडे गॉडडे चा
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा – कथल
सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा – वश
सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा – डीप फ्रीजर
सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा – हनूमान
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)
सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक – हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन – अॅनिमल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल – शिल्पा राव
सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार – कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी, जानकी बोडीवाला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी
सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल
सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा – नाळ 2
सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक – आशीष भेंडे (आत्मपॅम्फलेट)
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – 12th फेल