(मुंबई / गणेश तळेकर)
महाराष्ट्र चित्रपट व सांस्कृतिक विकास महामंडळ आणि भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “चित्रपट कसा बनवावा” या विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा दि. २ फेब्रुवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात होणार असून, दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कार्यशाळा पार पडेल.
चित्रनिर्मितीच्या विविध टप्प्यांबाबत सखोल मार्गदर्शन करणारी ही कार्यशाळा FTII, पुणे येथील प्राध्यापक डॉ. मिलिंद दामले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे नवोदित तसेच अभ्यासकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
कार्यशाळेसाठी सहभाग शुल्क रु. ३,५००/- (अक्षरी रुपये तीन हजार पाचशे फक्त) निश्चित करण्यात आले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी सुमेध आढाव मोबाईल : ८६५२२१५४०१ यांचेकडे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

