भारतीय वाहन बाजारात मागणीच्या आकड्यांनी सर्व विक्रेत्यांना खूश केले आहे. दरवर्षी लाखो वाहनांची विक्री होत असून, यामध्ये कार्सचा मोठा वाटा आहे. भारतीय वाहन बाजारात सध्या टाटा मोटर्सचा बोलबाला पाहायला मिळत आहे. कार सुरक्षेच्या बाबतीतही टाटा मोटर्स पुन्हा एकदा आघाडीवर आली आहे. दमदार स्कोर, अॅडव्हान्स फीचर्स आणि परफेक्ट सुरक्षेमुळे “टाटा” पुन्हा एकदा “सेफ्टी क्वीन” ठरली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्याअहवालानुसार, 2026 च्या पहिल्या महिन्यात देशातील सर्वाधिक मागणी असलेल्या Top 5 कार्सची यादी समोर आली आहे.
Tata Nexon
टाटा मोटर्सची कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Nexon मागील महिन्यात सर्वाधिक मागणी असलेली कार ठरली आहे. 2026 च्या पहिल्या महिन्यात Nexon च्या 23,000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही एसयूव्ही ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे.
Maruti Dzire
कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमधील Maruti Suzuki ची Dzire देखील मागील महिन्यात दमदार कामगिरी केली आहे. 2026 च्या पहिल्या महिन्यात या कारच्या 19,629 युनिट्सची विक्री झाली. परवडणारा किंमत आणि मजबूत मायलेज यामुळे Dzire ग्राहकांच्या पसंतीत आहे.
Tata Punch
टाटा मोटर्सची दुसरी एसयूव्ही Tata Punch देखील मागणीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागील महिन्यात 19,000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. टाटा ब्रँडच्या विश्वासार्हतेमुळे Punch ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.
Hyundai Creta
मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमधील Hyundai Creta ने देखील 2026 च्या पहिल्या महिन्यात चांगला प्रतिसाद मिळवला आहे. मागील महिन्यात या कारच्या सुमारे 18,000 युनिट्सची विक्री झाली. आकर्षक फीचर्स आणि मजबूत डिझाइनमुळे Creta ग्राहकांच्या पसंतीत आहे.
Maruti Ertiga
बजेट एमपीव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय कार Maruti Ertiga ने यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. मागील महिन्यात Ertiga च्या 17,892 युनिट्सची विक्री झाली आहे. कुटुंबीयांसाठी परफेक्ट आकार आणि परवडणारी किंमत ही Ertiga ची मुख्य आकर्षणे आहेत.

