(मुंबई)
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासनात बदल्यांचा सिलसिला सुरुच असून पुन्हा एकदा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज, ११ जुलै रोजी राज्य शासनाने ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्यांची घोषणा केली. याआधीच गेल्या महिन्यात ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
कोण कुठे? जाणून घ्या नव्या नेमणुका
-
ओम प्रकाश बकोरिया (IAS 2006 बॅच)
– सध्या पुण्यात समाजकल्याण आयुक्त म्हणून कार्यरत असलेले बकोरिया यांची पुणे MEDA (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) च्या महासंचालक पदावर नियुक्ती झाली आहे. -
अमगोथू श्री रंगा नाईक (IAS 2009 बॅच)
– मुंबईतील कुटुंब कल्याण आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (NHM) संचालक श्री रंगा नाईक यांची नियुक्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव (मुंबई) म्हणून करण्यात आली आहे. -
डॉ. कादंबरी बलकवडे (IAS 2010 बॅच)
– पुणे MEDA च्या महासंचालक पदावर असलेल्या डॉ. बलकवडे यांची नियुक्ती आता मुंबईतील कुटुंब कल्याण आयुक्त आणि NHM संचालक म्हणून करण्यात आली आहे. -
मकरंद देशमुख (IAS 2013 बॅच)
– सध्या हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक असलेले देशमुख यांची मुख्य सचिवांचे सहसचिव (मंत्रालय, मुंबई) म्हणून नियुक्ती झाली आहे. -
सुनील महिंद्राकर (IAS 2015 बॅच)
– पुण्यात महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व वैद्यकीय वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले महिंद्राकर यांची नियुक्ती आता हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक (मुंबई) म्हणून झाली आहे.
या बदल्यांमुळे विविध प्रशासकीय विभागांत ताजं नेतृत्व मिळणार आहे. सरकारच्या धोरणात्मक अंमलबजावणीत गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.