(रत्नागिरी)
गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरीच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात क्लबचे मुख्य प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, एशियन युनियन कोच श्री. प्रशांत मनिषा मनोज मकवाना तसेच महिला प्रशिक्षक सौ. रंजना मोंडूळा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित होणाऱ्या सर्व स्तरातील यशस्वी खेळाडूंनी एकत्र येत गुरूंना सस्नेह शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले.
गणराज क्लबमधून आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवणारे अनेक खेळाडू घडले आहेत. काही खेळाडू आज शिक्षक, डॉक्टर, सशस्त्र दलातील अधिकारी, तर काही अभियांत्रिकी व शासकीय सेवेत कार्यरत आहेत. क्लबचे माजी खेळाडू डॉ. मयुरेश नडगिरी (डॉक्टर), अनिकेत पवार (क्रीडा शिक्षक), अदिती शिवगण (नेव्ही), साहिल शिवगण (सिव्हिल इंजिनिअर), तसेच ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील पदक विजेत्या गौरी विलणकर व त्रिशा मयेकर, CBSE सुवर्णपदक विजेती सुरभी पाटील, राष्ट्रीय स्तरावरील सहभागी अथर्व मुरकुटे, राज्य पातळीवरील पदकविजेते बरखा संदे (रोप्य), दुर्वा हातिसकर (कास्य) यांचा यामध्ये समावेश आहे.
या दिवशी सर्व खेळाडूंनी आपल्या गुरूंचा सन्मान करत पुष्पगुच्छ देत त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले.
कार्यक्रमात सहभागी झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे:
विधी दुबे, अहद वस्ता, नीरज मकवाना, आहाना व आध्या रसाळ, जैनब काझी, तीर्था मकवाना, अनया वणजू, समर्थ विचारे, अथर्व मुरकुटे, विहान शेट्ये, बरखा संदे, दुर्वा हातिसकर, युमना संदे, अर्णव वणजू, अखिलेश वांयगणकर, मीरा वांयगणकर, स्पर्श रेडीज, माहीरा कदम, स्वराली व शौर्य जाधव, ध्रुव देशमुख, त्रिशा मयेकर, केशर शेरे, गौरी व श्रेष्ठा विलणकर, स्वानंद तुपे, गंधाली वणजू, आफरीन काझी, सारिका विलणकर, साक्षी मयेकर, शीतल वांयगणकर, तरन्नुम संदे, आशका रसाळ, स्वाती मुरकुटे, मानसी हातिसकर.
कार्यक्रमात गणराज क्लबचे अध्यक्ष वकील सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्षा सौ. साक्षी मयेकर, सचिव सौ. रंजना मोडूळा, सदस्य सौ. स्नेहा मोरे, श्री. परेश मोंडूळा, श्रीमती शलका जावकर यांच्यासह पालकवर्ग, वरिष्ठ खेळाडू डॉ. मयुरेश नडगिरी, अदिती शिवगण, गौरी विलणकर, साहील शिवगण, स्वानंद तुपे यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या उत्सवमय वातावरणात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली आणि खेळाडूंना प्रेरणादायी अशी गुरूंची शिकवण लाभली.

