(गणपतीपुळे / वैभव पवार)
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त मालगुंड शाखा व कोतवडे जिल्हा परिषद गट युवासेनेच्या वतीने गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात विशेष सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी श्री गणरायाच्या चरणी उद्धव ठाकरे यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे तसेच महाराष्ट्रात पुन्हा भगव्याचे राज्य प्रस्थापित व्हावे, अशी प्रार्थना शिवसैनिकांनी केली.
या कार्यक्रमास शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे, जिल्हा संघटक संजय पुनस्कर, विभागप्रमुख उत्तम मोरे, युवासेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख रोहित साळवी, माजी उपसरपंच संतोष चौघुले, उपशाखाप्रमुख पंकज खेऊर, उपशाखाप्रमुख हरिनाथ शिवगण, ज्येष्ठ शिवसैनिक जगन सुर्वे, अरुण पवार, गणपतीपुळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष समीर कदम यांच्यासह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

