(दापोली)
राज्य शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, दापोली तालुक्यातील एकूण १७ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांतील आहेत, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. यातील शिर्दे येथील श्रवण संदीप जालगावकर याने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत १० वा क्रमांक पटकावला असून, तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान देखील त्याने मिळवला आहे. याचं शाळेतील अनुज अमर जागडे यानेही जिल्हा गुणवत्ता यादीत आपली नोंद केली आहे.
गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या औचित्याने गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे आणि व्हिजन दापोली या शैक्षणिक उपक्रमाच्या मुख्य समितीच्या सदस्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांचा त्यांच्या शाळांमध्ये जाऊन सन्मान केला.
शिर्दे शाळेच्या अश्विनी थोरात यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे श्रवण व अनुजसह इतर विद्यार्थ्यांनीही उज्वल यश साध्य झाले. गटशिक्षणाधिकारी सांगडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, या १७ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.
या कार्यक्रमास पालक अमर जागडे, संदीप जालगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक व पालक यांचा गौरव करून यशासाठी शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांची नावे व त्यांच्या शाळा पुढीलप्रमाणे:
१) श्रवण संदीप जालगावकर – शिर्दे
२) ओंकार निधी विनोद – आओणनवसे
३) मिहिर महेश घाणेकर – देगाव
४) ऋग्वेद दत्तप्रसाद गुरव – ओळवण
५) सायली रामचंद्र शिर्के – आसूद रेवाळेवाडी
६) समृद्धी दिनेश रुके – कर्दे
७) प्राप्ती प्रमोद जाधव – बोरथळ
८) अरुष परेश भोगल – केळशी
९) धृव जलोशन नार्वेकर – केळशी-१
१०) विनित विनय राणे – विरसई
११) तन्मय संतोष कोळंबे – कोंढे नं. ३
१२) मयंक अनिल तेलप – मळे
१३) शर्वरी शांताराम टेमकर – आगरवायंगणी
१४) दीप श्रीकांत रेवाळे – किन्हळ
१५) अनुज अमर जागडे – शिर्दे
१६) रूद्र तुषार आंबेकर – केळशी
१७) वेद विनोद आंबेकर – आगरवायंगणी
इयत्ता ८वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील विद्यार्थी (बोरीवली जि.प. शाळा):
१) वेदांग रविंद्र तांबट
२) श्रेयश मंगेश आडविलकर
या सर्व विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना मिळालेल्या यशरूपी भेटीद्वारे एक विशेष अभिवादनच अर्पण केल्याचे गौरवोद्गार सांगडे यांनी यावेळी काढले. व्हिजन दापोलीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ असल्याचेही ते म्हणाले.

