( खेड )
खेड रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये बसले असताना एका तरुणाच्या बॅगेवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत तब्बल १५,६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी (३ जुलै) सकाळी ८.१० च्या सुमारास घडली असून, याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विश्व संतोष खुरसडे (वय २१, व्यवसाय : शिक्षण, रा. हाऊस नं. ३४०/०१, ओपन गणपती मंदिर, कुलकर्णी प्लॉट, भुसावळ, जिल्हा जळगाव, सध्या राहणार सिल्वासा, दादरा नगर हवेली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ते खेड रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये थांबले असताना ही चोरी घडली. खुरसडे यांच्या काळ्या रंगाच्या कॉलेज बॅगेत अॅपल कंपनीचे १०.२ इंच लांबीचे नऊव्या जनरेशनचे आयपॅड (किंमत १५,००० रुपये) व १० ग्रॅम वजनाची सुमारे ६०० रुपये किमतीची चांदीची चैन होती. अज्ञात चोरट्याने बॅगसह संपूर्ण ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २१४/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.