(खेड)
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे आज खेड शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी वैभव खेडेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शाल श्रीफळ आणि गणेशाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. यावेळी वाशिष्ठी समूहाचे अध्यक्ष प्रशांत यादव, केदार साठे, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह खेड तालुक्यातील नागरिक आणि वैभव खेडेकर यांचे समर्थक उपस्थित होते.

